About
उत्तम चव आणि गुणवत्तेसाठी लक्ष्मी मंगलम फरसाण, २०१० पासून महाराष्ट्राचा विश्वासू ब्रँड
About us
नमस्कार “लक्ष्मी मंगलम फरसाण” या ट्रेडमार्क रजिस्टर ब्रॅण्डची ओळख करून देताना मला अतिशय आनंद होत आहे.
सण २०१० मध्ये आम्ही या व्यायसायाची मुहूर्तमेढ रोवली व अगदी छोटाशा जागेत घरामध्ये हा व्यायसाय चालू केला. त्यावेळी मला घरच्यांची मोलाची साथ मिळाली. सुरवाती पासूनच आम्ही हिरा बेसन आणि रिफाईंड तेल याचा वापर करून फरसाण बनवत आहोत. सुरवातीला फक्त मरकळ आणि आजूबाजूचा गावात बनवलेला माल आम्ही विकत असू परंतु चव आणि गुणवत्तेचा जोरावर व आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आम्ही आमच्या व्यवसायाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र भर केला व आमची उत्पादने संपूर्ण गावात आणि दुकानात दिसू लागली, परंतु बाजारातली वाढती स्पर्धा वस्तूची किंमत कमी करून व त्याची गुणवत्ता खालावुन जास्त नफा कमावण्याची इर्षा व मार्जिन कमावण्याचा विचार यामुळे बाकीचा कंपन्यची मक्तेदारी बाजारात वाढली व त्यामुळे जास्त पैसे मोजूनही हलक्या दर्जाचे भेसळयुक्त व वापरलेले तेल वापरून कनिष्ठ दर्जाचे फरसाण आणि उपवासाचे पदार्थ ग्राहकाचा वाट्याला येऊ लागले. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही खास ग्राहकाचा आग्रहाखातीर आम्ही आमचे पहिले फॅक्टरी आउटलेट आमच्या मूळ गावी म्हणजेच ‘मरकळ’ येथे चालू केले.
” लक्ष्मी मंगलम फरसाण फॅक्टरी आउटलेट ” या नावाने चालू केलेल्या पहिल्या आऊटलेट्ची ख्याती हळूहळू सर्वत्र पसरली. आमच्या मालाची गुणवत्ता आणि टेस्ट यामुळे आम्हाला अगदी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमधून ग्राहक येऊ लागले. परंतु नेहमी नेहमी आम्ही इतक्या लांबुन प्रत्येक वेळी येऊ शकत नाही अशी त्यांची प्रेमळ तक्रार येऊ लागली. म्हणूनच आम्ही यावर तोडगा म्हणून आमच्या या आऊटलेट व्यवसायाचा प्रथमता संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड व नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तार करण्याचे ठरवले आहे व त्यासाठी आम्ही आमच्या शाखा सगळीकडे चालू करणार आहोत.
Our Vision
उच्च गुणवत्तेचे फरसाण पुरवणारे अग्रगण्य पुरवठादार बनणे, महाराष्ट्र आणि पलीकडे प्रत्येक घरी आनंद आणि पारंपारिक चवी पोहोचवणे
Our Mission
लक्ष्मी मंगलम फरसाणमध्ये, आम्ही स्वादिष्ट, पारंपारिक स्नॅक्स तयार करण्यासाठी सर्वोत्तम सामग्री वापरण्याचे वचन देतो. आम्ही गुणवत्तेचे आणि स्वच्छतेचे उच्चतम मानदंड राखण्याचे लक्ष्य ठेवतो, ज्यामुळे प्रत्येक चवीत आमच्या उत्कृष्टतेची आणि ग्राहक समाधानाची प्रतिबिंबित होते
आमचे फरसाण का निवडावे?
आमच्या उत्कृष्टतेच्या वचनामुळे प्रत्येक वेळेस आनंददायक स्नॅकिंग अनुभव मिळतो
1
उच्च प्रतीची सामग्री
सर्वोत्तम चव आणि ताजेपणासाठी आम्ही फक्त उत्तम सामग्री वापरतो.
2
पारंपारिक रेसिपी
आमचे फरसाण पारंपारिक रेसिपीनुसार तयार केले जाते, ज्यामुळे तुम्हाला खऱ्या चवीचा अनुभव मिळतो.
3
स्वच्छ आणि सुरक्षित तयारी
आमची सर्व उत्पादने स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात तयार केली जातात.